विवाह करण्याचे वचन देऊन संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार नाही ! – देहली उच्च न्यायालय

देहली – विवाहाचे वचन देऊन संमतीने शारीरिक संबंध ठेवले आणि काही कारणाने विवाह झाला नाही, तर तो बलात्कार होत नाही, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या वेळी दिला आहे. या प्रकरणात एक तरुण आणि तरुणी यांचा साखरपुडा झाला होता; मात्र त्यांचा विवाह काही कारणामुळे झाला नाही. मधल्या  काळात त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले.

न्यायालयाने सांगितले की, तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीने मुलीच्या आई-वडिलांना विवाहाला अनुमती देण्यासाठी सिद्ध केले होते. यासाठी ३ मास लागले. या काळात दोघांमध्ये जे शारीरिक संबंध निर्माण झाले, त्यात तरुणीची संमती ही गैरसमज किंवा भीती यांवर आधारित नव्हती. दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यात कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. यावरून असे दिसून येते की, याचिकाकर्त्याचा आरोपीशी विवाह करण्याचा हेतू खरा होता. केवळ संबंध तुटल्यामुळे याचिकाकर्त्याचा आरोपीशी विवाह करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असा दावा करता येणार नाही.