ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ भूतकाळ वाटतो, त्यांनी देहलीतील दंगल पहावी !

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची निधर्मीवाद्यांवर प्रखर टीका

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री

मुंबई – ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट केवळ काश्मीरचा भूतकाळ होता’, असे वाटत असेल, तर ती त्यांची चूक आहे. ‘तो भारतात भविष्यात काय घडणार आहे?’, हे सांगणारा ‘संक्षिप्त भाग’ (ट्रेलर) आहे. भारतात हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर झालेली आक्रमणे, हा त्याचा पुरावा आहे, असे ट्वीट करून ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देहलीच्या जहांगीरपुरी येथील धर्मांधांनी केलेल्या दंगलीचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. येथे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर मशिदीमधून दगडफेक करण्यात आली होती, तसेच धर्मांधांनी पिस्तुल आणि तलवारी यांद्वारे हिंदूंवर, तसेच पोलिसांवर आक्रमण केले होते.

विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटवर अनेक लोकांनी ट्वीट्स करून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका हिंदु व्यक्तीने म्हटले, ‘आपल्यावर होणाऱ्या आक्रमणांना आपला भित्रेपणा, जातीयवाद, स्वार्थीपण आणि लोभीपणा उत्तरदायी आहे. आपण केवळ स्वतःचा विचार करतो. जिहादी त्यांच्या धर्मासाठी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचा विचार करतात. काही हिंदूंना त्यांनी पूजा केली, तरी  त्याची लाज वाटते; मात्र दर्ग्यावर चादर चढवणे ‘फॅशन’ आहे. त्याचा परिणाम म्हणजे अशी आक्रमणे आहेत.