देहली – रामनवमीच्या पावन दिनी देहलीच्या सरिता विहारमध्ये सनातनच्या सौ. प्रोमिला अगरवाल यांच्या निवासस्थानी आणि ९ एप्रिल या दिवशी मंदाकिनी एनक्लेव्ह येथे श्रीरामनामसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या नामसंकीर्तनाचा अनेक भक्तांनी लाभ घेतला. यासमवेतच पंजाबच्या खरड येथे ‘कम्फर्ट होम सोसायटी’च्या शिवशक्ती मंदिरामध्ये श्रीरामनामसंकीर्तन झाले. यालाही जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्रंथ आणि फलक प्रदर्शन अन् फलक लिखाण
देहलीच्या ग्रेटर कैलासमध्ये असलेल्या सनातन धर्म मंदिरात ९ एप्रिल या दिवशी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. तसेच नोएडामध्ये २ ठिकाणी श्रीरामनवमीविषयी शास्त्रीय माहिती देणारे भीत्तिपत्रक लावण्यात आले. यासह नोएडा आणि पंजाब येथे प्रत्येकी एका ठिकाणी फलक लिखाण करण्यात आले.
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार
(म्हणे) ‘सध्या तळागाळातील युवकांमध्ये जागृती करण्याचेच आमचे ध्येय !’ – कॉकरोच जनता पक्ष
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
सनातन संस्थेच्या वतीने ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव