पुणे, २४ डिसेंबर (वार्ता.) – पुणे येथील सनातन संस्थेच्या ५८ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांनी २४ डिसेंबर २०२३ या दिवशी सकाळी ७ वाजता देहत्याग केला. वृद्धापकाळामुळे त्या आजारी होत्या. सनाततनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी फाल्गुन शुक्ल पक्ष नवमी (१७.३.२०१६) या दिवशी त्यांना ‘संत’ म्हणून घोषित केले होते. पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी या आनंदी, स्थिर आणि शांत स्वभावाच्या होत्या. त्यांना सेवेची तीव्र तळमळ होती. उतारवयातही स्वतःमध्ये पालट करण्याची त्यांची तळमळ तीव्र होती.
सनातन संस्थेच्या पुणे येथील साधिका आधुनिक वैद्या ज्योती काळे यांच्या त्या आई होत्या. पू. आजींच्या पश्चात १ सून, १ मुलगी, २ नाती आहेत. २४ डिसेंबर या दिवशी दुपारी नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी पू. आजींच्या पर्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. या वेळी सनातनचे काही साधकही उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. अंत्ययात्रा जात असतांना रस्त्यावरील काही लोक भावपूर्णपणे नमस्कार करत होते.
२. पू. काळेआजींचा चेहरा तेजस्वी आणि प्रसन्न दिसत होता.
३. वातावरणात हलकेपणा जाणवत होता.
(निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)