हिंदू महासभेच्या माजी संघटनमंत्री श्रीमती सुवर्णा संजय पवार यांचे अल्पशा आजाराने निधन ! 

श्रीमती सुवर्णा संजय पवार

कोल्हापूर – राजारामपुरी येथील हिंदू महासभेच्या माजी संघटनमंत्री श्रीमती सुवर्णा पवार (वय ४६ वर्षे) यांचे ४ जानेवारी या दिवशी शाहूनगर येते रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. श्रीमती पवार यांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून अनाथ, महिला, परितक्त्या महिलांना न्याय मिळवून दिला होता. कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात येणार्‍या आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग होता.