कर्तव्याचे पालन करतांना पोलिसांमध्ये नेहमी दिसून येणारी कर्तव्यचुकारता आणि कायद्याच्या पालनाविषयीची उदासीनता !

पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल.

(म्हणे) ‘भ्रष्टाचार हा कार्यपद्धतीचा भाग !’ – हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक

अशा भ्रष्ट पोलीस प्रशासनामुळेच आजवर लक्षावधी लोक न्यायापासून वंचित राहिले, सहस्रो हिंदूंवर अन्याय झाले, शेकडो गुन्हेगार मोकाट सुटले आणि कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असेच कुणालाही वाटेल !

आनेवाडी आणि खेड-शिवापूर येथील पथकर नाक्यावर बनावट देयके देऊन फसवणूक

कर्मचारी कोट्यवधींचा महसूल बुडवेपर्यंत कोणालाही कसे लक्षात आले नाही ?

५ संशयितांविरुद्ध अडीच सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट; ६१ कोटींहून अधिक अपहाराचा ठपका

भाईचंद हिराचंद रायसोनी बी.एच्.आर्. अपव्यवहारप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात ५ संशयितांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केले.

मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या आमदाराकडील ४५० कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त

हिंदु राष्ट्रात अशांवर कठोर कारवाई करून सर्व बेहिशोबी संपत्ती जप्त करण्यात येईल !

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार नीलय डागा यांच्या सोलापुरातील घरावर प्राप्तीकर विभागाची धाड

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार नीलय डागा यांची देशभरात गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशसह अन्य राज्यांमध्ये अनुमाने २० खाद्यतेल आस्थापने आहेत. करभरणा टाळण्यासाठी त्यांनी रोखीने व्यवहार केल्याविषयी त्यांच्या आस्थापनांवर एकाच वेळी धाड टाकण्यात आली आहे.

शासनाकडून पोलीस महासंचालकांना पत्र जाऊनही अद्याप कारवाई नाही !

श्री भवानीदेवीच्या मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. गुन्हे अन्वेषण यंत्रणेच्या वतीने केलेल्या चौकशीचा अहवाल घोषित करावा, दोषींना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून असा अपहार भविष्यात कुणी करण्याचे धैर्य करणार नाही.

पोलिसांकडे महागाच्या गाड्या कोठून आल्या ? – अजित पवार, उपमुख्यमंत्री

‘पोलीस किती भ्रष्ट आहेत’, हे पवारांना माहीत नाही, असे नाही. त्यामुळे पोलिसांच्या पत्नी घराचे प्रश्‍न घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी ही पोलिसांना दिलेली गर्भित चेतावणी तर नाही ना ?, असे कुणालाही वाटू शकते !

उत्तरप्रदेशात मंदिराची भूमी बळकावण्यासाठी देव मरण पावल्याची कागदोपत्री नोंद !

हिंदूंनो, अशा घटनांमुळेच मंदिरांचे सरकारीकरण करण्याचे कारण राज्य सरकारांना मिळते आणि ते मंदिरे नियंत्रणात घेतात, हे लक्षात घ्या !

सार्वजनिक विहिरींच्या देयकासाठी ३७ सहस्र रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी गटविकास अधिकार्‍याला अटक !

लाचखोरी रोखण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद हवी !