चीनने संरक्षण खर्चात केली ७.१ टक्के वाढ !

बीजिंग (चीन) – चीनने त्याच्या संरक्षण खर्चामध्ये ७.१ टक्क्यांनी वाढ केली आहे. चीनने वर्ष २०२२ च्या आर्थिक वर्षासाठी १७ लाख ७५ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद भारताच्या संरक्षण खर्चाच्या तिप्पट आहे. भारताने ५ लाख २५ सहस्र कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ‘चीनने वाढवलेल्या तरतुदीमुळे तो भारताच्या सीमेवर सैनिकांच्या संख्येत वाढ करू शकतो आणि घुसखोरी करू शकतो’, असे म्हटले जात आहे.