अमेरिकेच्या लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बाँब टाका ! – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने त्याच्या वायूदलाच्या एफ्-२२ या लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बाँब टाकावेत. यानंतर ‘चीनने हे केले’, असे सांगून आपण केवळ मागे बसून त्यांच्यातील भांडण पहात रहायचे, असे विधान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.

रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ट्रम्प यांनी या वेळी ‘नाटो’चा ‘कागदावरील वाघ’ असा उल्लेख केला.