चीनचे कोणतेही साहित्य हे लाभदायक ठरण्यापेक्षा त्रासदायक ठरते आणि ते हलक्या दर्जाचे असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले ! – संपादक
बीजिंग (चीन) – चीननिर्मित कोरोना प्रतिबंधात्मक लसींमुळे नागरिकांना ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) होत असल्याचा गुप्त अहवाल चीनच्याच राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिल्याची माहिती समोर आली आहे. या आयोगाच्या अहवालाची प्रत हेबेई, लिओनिंग, सिचुआन, शांक्सी यांसह १८ प्रांतांना पाठवण्यात आली आहे.
लस घेतलेले अनेक नागरिक त्यांना ‘ल्युकेमिया’ झाल्याच्या तक्रारी आयोगाच्या अधिकार्यांकडे करत होते. ल्युकेमियाने ग्रस्त झालेली कुटुंबे ‘वुई चॅट’ या चीनच्या सामाजिक माध्यमातून त्यांचा अनुभव सांगत आहेत. आयोगाच्या अहवालात म्हटले आहे की, या लोकांचा आवाज दाबण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने कारवाई करणे चालू केले आहे. (चीनची हुकूमशाही ! – संपादक)
Chinese health commission document reveals country’s #Covid19 vaccines caused leukaemia #China https://t.co/zaJnPfDIyU
— Organiser Weekly (@eOrganiser) March 8, 2022
चीनने लसींच्या १५० कोटी मात्रा विदेशात निर्यात केल्या !
जागतिक आरोग्य संघटनेने चीनच्या ‘सिनोफार्म’ आणि ‘सिनोव्हाक-कोरोनाव्हॅक’ या लसी आपत्कालीन वापरासाठी प्रमाणित केल्या होत्या. या दोन्ही लसी चिनी औषधनिर्मिती करणार्या आस्थापनांनी विकसित केल्या आहेत. नोव्हेंबर २०२१ मधील ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालानुसार, चीनने जगभरात या लसींच्या १५० कोटींहून अधिक मात्रा निर्यात केल्या होत्या. त्यामुळे विदेशातील लोकांनाही हा आजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘ल्युकेमिया’ म्हणजे काय?हा रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे, जो शरिरात पांढर्या रक्त पेशींच्या संख्येत वाढ झाल्यामुळे होतो. पांढर्या रक्त पेशी वाढल्यानंतर त्या लाल रक्त पेशींवर वरचढ होतात. |