भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला १ लाख रुपये अर्पण !

समाजात भौतिक शिक्षण देणारी अनेक विश्वविद्यालये आहेत; मात्र ईश्वरप्राप्तीचे आणि अध्यात्मशास्त्राचे परिपूर्ण शिक्षण देणारे एकही विश्वविद्यालय नाही.

संत आणि मान्यवर यांच्या भूमिकेतून भारताची महानता !

‘भारतात सुराज्य आणायचे असेल, तर ‘अध्यात्म’ हाच एकमेव पर्याय आहे. भारताचा पुनर्जन्मच विश्वाला भौतिकवादाच्या गुलामीतून सोडवू शकतो.’

प्रख्यात प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट

भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी १९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची माहिती जाणून घेतली.

‘सनातन प्रभात’ हे सिद्धांताने चालणारे वृत्तपत्र ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

‘सनातन प्रभात’ हे न्यायाने, धर्माने आणि सिद्धांतावर चालणारे वृत्तपत्र आहे. धर्माच्या प्रचारासाठी वृत्तपत्र चालवणे, हेच जिकरीचे काम आहे.

ग्‍लानी आलेल्‍या धर्माला तेजतत्‍व देण्‍याचे काम डॉ. जयंत आठवले आणि सनातन संस्‍था यांनी केले ! – भारताचार्य सु.ग. शेवडे, डोंबिवली

प.पू. भक्‍तराज महाराज यांचे शिष्‍य या दृष्‍टीने विचार केला, तर डॉ. जयंत आठवले यांनी त्‍यांच्‍याकडून भक्‍तीचा मार्ग उत्तम प्रकारे प्राप्‍त केला आहे. केवळ प्राप्‍त केला नाही, तर ‘जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे । सकळ जन ।’ या समर्थांच्‍या उक्‍तीप्रमाणे त्‍यांनी त्‍यांचे अवघे आयुष्‍यच या कार्यासाठी वेचले आणि सनातन संस्‍थेचा डोलारा उभा केला.

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी सुमंगला शेवडे यांचे निधन

भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या धर्मपत्नी,  राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या मातोश्री आणि डॉ. परिक्षित शेवडे यांच्या आजी सौ. सुमंगला शेवडे यांचे १ एप्रिल या दिवशी चेंबूर (मुंबई) येथे सकाळी १० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.

छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास रंगवला गेला ! – सु.ग. शेवडे, ज्येष्ठ इतिहासकार

सु.ग. शेवडेगुरुजी म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणलाच गेला नाही. ज्या महिला जन्मालाच आल्या नव्हत्या, अशा महिला निर्माण करून त्यांच्याशी संभाजी महाराज यांचा संबंध जोडण्यात आला. त्यांना व्यसनी असल्याचे भासवण्यात आले.’’