भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्याकडून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला १ लाख रुपये अर्पण !

भारताचार्य सु.ग. शेवडे

मुंबई – प्रख्यात प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची नोंद घेतली. त्यावरून भारताचार्य शेवडे यांनी १ लाख रुपयांचा निधी अर्पण केला आहे.

या साहाय्याबद्दल महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने भारताचार्य शेवडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय स्थापन करण्यामागील उद्देश

समाजात भौतिक शिक्षण देणारी अनेक विश्वविद्यालये आहेत; मात्र ईश्वरप्राप्तीचे आणि अध्यात्मशास्त्राचे परिपूर्ण शिक्षण देणारे एकही विश्वविद्यालय नाही. यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी वर्ष २०१४ मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. हे विश्वविद्यालय अध्यात्माचे परिपूर्ण शिक्षण देण्यासाठी, तसेच आध्यात्मिक संशोधन करण्यासाठी कार्यरत आहे. ‘हे विश्वविद्यालय प्राचीन तक्षशिला आणि नालंदा विश्वविद्यालयांसारखे असेल. या विश्वविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे संत होऊनच बाहेर पडतील’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितले आहे. वैज्ञानिक परिषदांमध्ये या विश्वविद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधप्रबंध सादर केले जातात.