संत आणि मान्यवर यांच्या भूमिकेतून भारताची महानता !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘भारत ही तपोभूमी, पुण्यभूमी आणि कर्मभूमी आहे. आज ‘पूर्व आणि पश्चिम संघर्ष’ असे काही नसून ‘भारतवर्ष आणि सर्व जग’, असा संघर्ष आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित)

‘राष्ट्र म्हणजे भाषिक, धार्मिक, वांशिक दृष्टीने एकजीव असलेला आणि विशिष्ट प्रदेशात रहाणारा लोकसमुदाय.’ 
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’)

महर्षी अरविंद

‘भारतात सुराज्य आणायचे असेल, तर ‘अध्यात्म’ हाच एकमेव पर्याय आहे. भारताचा पुनर्जन्मच विश्वाला भौतिकवादाच्या गुलामीतून सोडवू शकतो.’
– महर्षी अरविंद

‘सनातन धर्माच्या वाढीतच भारताची उन्नती आहे आणि सनातन धर्माचा र्‍हास झाल्यास भारतही नष्ट होईल !’
– महर्षी अरविंद

स्वामी विवेकानंद

माणसाच्या मनाच्या प्रगतीविषयी भारताप्रमाणे जगातील एकाही देशाने कार्य केलेले नाही !

‘मी जेव्हा माझ्या देशाच्या इतिहासाकडे वळून पहातो, तेव्हा मला असे दिसते की, संपूर्ण जगामध्ये असा एकही देश नाही की, ज्या देशाने माणसाच्या मनाच्या प्रगतीच्या बाबतीत एवढे मोठे कार्य केले असेल.’
– स्वामी विवेकानंद (श्री. राजाभाऊ जोशी, मासिक लोकजागर, दिवाळी विशेषांक)

भारताचार्य सु.ग. शेवडे

‘हिंदुत्व’ हेच राष्ट्र्रीयत्व आणि ‘भारतीय’ हा आमचा पत्ता !

‘अनेक लोक जेथे रहातात, तो भूभाग म्हणजे केवळ देश असतो; पण एक संस्कृती, एक भाषा, एक धर्म, एक इतिहास, एक आदर्श असे असणारा जनसमुदाय, म्हणजे एक राष्ट्र असते. हिंदुस्थानात हिंदु हा धर्म, संस्कृत हीच मुख्य भाषा, भारतीय संस्कृती हा सर्वांचा समान इतिहास व समान पूज्यस्थाने असणारे हिंदू हेच राष्ट्र आहे. ‘हिंदुत्व’ हेच येथील राष्ट्र्रीयत्व आहे. ‘भारतीय’ हा आमचा पत्ता झाला. ‘हिंदु’ही आमची ओळख आहे. ‘हिंदुत्व’ हेच आमचे राष्ट्र्रीयत्व आहे. असा एकजिनसी आणि स्वाभिमानी समाज अत्यंत शक्तीमान असतो; मात्र त्याला राष्ट्र्रीयत्वाची जाण हवी. तो लहान का असेना! इस्त्रायलमधील ज्यू लोक हे काही लाखांच्या संख्येनेच आहेत; पण ते एक भक्कम राष्ट्र आहे.’
– प्रा. सु.ग. शेवडे (भारतीय संस्कृती, पृष्ठ क्र. ३३)