भोपाळ येथील काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांच्या विरोधात अटक वॉरंट

फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या विरोधात दिले होते भडकावू भाषण ! फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी महंमद पैगंबर यांच्याविषयी विधान केल्यावर भारतात त्याचा विरोध ? किती हिंदू आणि त्यांचे लोकप्रतिनिधी भारतात त्याच्या देवतांचा अवमान केल्यावर त्याला विरोध करतात ?

फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ख्रिस्ती पाद्री अन् त्याच्या पत्नीला अटक

पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातून पोलिसांनी शेफर्ड बुशिरी या पाद्य्राला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. हा पाद्री त्याच्या अनुयायांमध्ये ‘प्रेषित’ म्हणून प्रसिद्ध आहे.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे बनावट नोटाप्रकरणी एकास अटक

२ युवक चारचाकी वाहनामध्ये बसून दोनशे आणि पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणत होते.

३० लाखांच्या मुद्देमालासह ५० हून अधिक घरफोड्या करणारे सराईत चोरटे जेरबंद !

शहर आणि परिसरात ५० हून अधिक घरफोड्या करणार्‍या सनिसिंग दूधानी आणि सोहेल जावेद शेख यांच्यासह एका अल्पवयीन चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या युवकाला अटक

अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी एका युवकाला निवती पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

बोलेरो वाहनाच्या चोरीप्रकरणी धर्मांधाला पोलीस कोठडी

वाहनाची चोरी केल्याप्रकरणी संशयित हबीब रहिमतुल्ला गडकरी याला ७ दिवसांची पोलीस कोठडी

बेंगळुरू दंगलीच्या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर संपत राज यांना अटक

धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर संपत राज यांना अटक केली आहे. त्यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप आहे. या दंगलीत ४ जणांचा मृत्यू झाला होता.

सुरूर (जिल्हा सातारा) येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी रोखली गोवंशियांच्या मांसाची तस्करी : दोघांना अटक

गोवंश हत्याबंदी कायदा असतांना गोवंशियांच्या मांसाची मोठ्या प्रमाणात तस्करी होणे हे प्रशासनाचे अपयशच होय. गोतस्कर आणि गोहत्या करणारे यांना कठोर शिक्षा न केल्याचेच हे फलित आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

देहलीमध्ये जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक

देहली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.