बेंगळुरू दंगलीच्या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर संपत राज यांना अटक

काँग्रेसच्याच आमदाराच्या घरावर आक्रमणासाठी धर्मांधांना चिथावल्याचा आरोप

हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत, हेच यातून लक्षात येते ! स्वतःच्या पक्षातील आणि तेही हिंदु आमदारांवर आक्रमण करण्यासाठी एक हिंदू हा धर्मांधांना चिथावतो, याहून भयंकर गोष्ट दुसरी कोणती असेल ! अशांना हिंदूंनी पुढील निवडणुकीत धडा शिकवल्यास आश्‍चर्य वाटू नये !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे धर्मांधांनी केलेल्या दंगलीच्या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी महापौर संपत राज यांना अटक केली आहे. त्यांच्यावर जमावाला भडकावल्याचा आरोप आहे. या दंगलीत ४ जणांचा मृत्यू झाला होता. ११ ऑगस्टच्या रात्री शहरातील देवरा जीवनहळ्ळी आणि कडुगोंडनहळ्ळी भागात ही दंगल झाली होती. धर्मांधांनी देवरा जीवनहळ्ळी आणि कडुगोंडनहळ्ळी पोलीस ठाण्यांना आग लावली होती. तसेच काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरालाही आग लावण्यात आली होती.

मूर्ती यांच्या घरावर आक्रमण करण्यासाठी धर्मांधांच्या जमावाला नगरसेवक संपत राज यांनी भडकावले होते. मूर्ती आणि त्यांची बहीण जयंती यांना लक्ष्य करण्यासाठी संपत राज यांनी जमावाला चिथावले होते. संपत राज यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर रुग्णालयात भरती होते; मात्र नंतर ते तेथून पसार झाले होते.