गोरक्षकांवर खोटे गुन्‍हे नोंद करणार्‍या पोलिसांच्‍या विरोधात पुणे येथे चिल्लर फेक आंदोलन’ !

गोरक्षकांवर जाणूनबुजून खोटे गुन्‍हे नोंद केल्‍याविषयी पोलीस प्रशासनावर कारवाई व्‍हावी, यासाठी हे आंदोलन करण्‍यात आले. गोरक्षक श्री. अक्षय कांचन यांनी एक गाडी पकडली होती. त्‍यामधील म्‍हशी पोलिसांनी कोणताही विचार न करता पशूवधगृहामध्‍ये दिल्‍या

ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधातील कुस्तीपटूंचे आंदोलन मागे !

याविषयी कुस्तीपटू साक्षी मलिक यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. ‘न्याय मिळेपर्यंत कुस्तीपटूंची रस्त्यावरील लढाई आता न्यायालयात चालू राहील’, असे तिने म्हटले आहे.

सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या रिक्त पदांवर निवृत्त शिक्षक किंवा डी.एड्. उमेदवार यांना सामावून घेणार !

यामध्ये गुणवत्ता सूचित आलेल्यांनाच संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी २० सहस्र रुपये मानधन ठरवण्यात आले आहे; मात्र यात निवड झालेले उमेदवार भविष्यात ‘सेवेत कायम करा’, असा दावा करू शकत नाहीत.

जुगाराचे अड्डे बंद करण्‍याच्‍या मागणीसाठी अर्धनग्‍न आंदोलन करणार्‍यावर गुन्‍हा नोंद !

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार रमेश पाटील विनाअनुमती पोलीस आयुक्‍त कार्यालयाच्‍या प्रवेशद्वारासमोर सार्वजनिक ठिकाणी पोचल्‍यावर महिलांना लज्‍जा निर्माण होईल असे अश्‍लील लैंगिक हावभाव करू लागला. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर गुन्‍हा नोंद केला.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी नगरपरिषदेत विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार !

या आरोपांच्या प्रकरणी तातडीने अन्वेषण करून दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

जिहाद्यांनो, पुढील ३० दिवसांत हिमाचल प्रदेश सोडून जा !

जर सरकार जिहाद्यांच्या विरोधात कठोर होणार नसेल, तर भविष्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी अशी चेतावणी देणे चालू केले, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवट, हेच सत्य आहे !

सिंधुदुर्ग : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी उपोषणाची चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ?

अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांना काही संघटनांकडून करण्यात येत आहे विरोध !

न्यूयॉर्क येथील ‘देसीस रायझिंग अप अँड मुव्हिंग’, ‘हिंदुज फॉर ह्युमन राइट्स’, ‘क्वीन्स अगेन्स्ट हिंदू फॅसिझम्’ आणि ‘वर्ल्ड सिख पार्लिमेंट’ अशा संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे एस्.एस्.सी. बोर्डातून सी.बी.एस्.ई. बोर्डात बळजोरीने स्थलांतर !

सरकार मराठी वाचवण्यासाठी प्रयत्नरत असतांना, सरकारच्या अनुदानावर चालणारे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा डाव रचत आहेत. अशांची मान्यता रहित का करू नये ?

सी.बी.एस्.ई. शाळेसाठी शिक्षक भरती प्रक्रिया रखडल्‍याने मनविसेची आंदोलनाची चेतावणी !

गेली दोन वर्षे नवी मुंबई महानगरपालिकेने कोपरखैरणे येथे सी.बी.एस्.ई. बोर्डाची शाळा चालू केली आहे; पण तिला अद्याप मान्‍यता मिळालेली नाही. शाळेत शिक्षकही नाहीत.