Hardeep Puri Accuses Rahul Gandhi : राहुल गांधी यांची मानसिकता जिनांसारखी ! – केंद्रीय मंत्री हरदीप पुरी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देशात फुटीरतावादी विचार वाढवायचा आहे. त्‍यांना रक्‍ताने माखलेला देश पहायचा आहे, असे विधान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी येथे केले.

Trump Assassination : अमेरिकेत माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्‍यावर पुन्‍हा गोळीबार !

फ्‍लोरिडा येथील पाम बीचवर ट्रम्‍प गोल्‍फ क्‍लबच्‍या बाहेर १५ सप्‍टेंबर या दिवशी झालेल्‍या गोळीबारात माजी राष्‍ट्राध्‍यक्ष आणि अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदाचे रिपब्‍लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प थोडक्‍यात बचावले. गोळीबार झाला, त्‍या वेळी ट्रम्‍प क्‍लबमध्‍ये गोल्‍फ खेळत होते.

अमेरिकेचे वरिष्ठ राजनैतिक सल्लागार बांगलादेशात !

तत्पूर्वी बांगलादेशाचे परराष्ट्र सचिव एम्.डी. जशीम उद्दीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अंतरिम सरकारच्या स्थापनेनंतर अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे आगमन हे बांगलादेशासोबतच्या संबंधांना अमेरिका किती महत्त्व देते, हे दर्शवते.

Amit Shah : देशविरोधी शक्‍तींमागे उभे राहणे, ही राहुल गांधी यांची सवय ! – अमित शहा

गृहमंत्री अशा व्‍यक्‍तीला कारागृहात का टाकत नाहीत ?

Production Moved to China : (म्‍हणे) ‘भारतात बेरोजगारी ही सर्वांत मोठी समस्‍या, तर चीन सातत्‍याने रोजगार वाढवत आहे !’ – राहुल गांधी

राहुल गांधी यांच्‍यासारख्‍या काँग्रेसी नेत्‍यांना कुठे आणि काय बोलले पाहिजे, याचेही भान नाही. भारतविरोधी कथानक रचण्‍यासाठी ते विदेशी भूमीवर भारताचे शत्रुराष्‍ट्र चीनची स्‍तुती करतात. अशा नेत्‍यांवर राष्‍ट्रद्रोहाचा गुन्‍हा का नोंद केला जाऊ नये ?

India-US Joint Military Exercise : बिकानेरमध्‍ये भारत आणि अमेरिका यांचा संयुक्‍त सैनिकी सरावास प्रारंभ

वालुकामय ढिगार्‍यात ९ सप्‍टेंबरपासून भारत आणि अमेरिका यांच्‍या संयुक्‍त सरावास प्रारंभ झाला. दोन्‍ही देशांमधील आतापर्यंतचा सर्वांत मोठा युद्धसराव २२ सप्‍टेंबरपर्यंत चालू रहाणार आहे. या संयुक्‍त सैनिकी सरावाचा उद्देश दोन्‍ही सैन्‍यांमधील समन्‍वय बळकट करणे आणि देश अन् जगासमोरील सुरक्षा आव्‍हाने सोडवणे, हा आहे.

Sam Pitroda Defends Rahul Gandhi : (म्‍हणे) ‘राहुल गांधी हे उत्तम रणनीतीकार !’ – सैम पित्रोदा, ‘इंडियन ओव्‍हरसीज काँग्रेस’चे अध्‍यक्ष

राहुल गांधी, हे ‘पप्‍पू’ (कसेही वागणार्‍याला उपहासाने पप्‍पू म्‍हणतात) नाहीत, तर ते एक उत्तम रणनीतीकार आहेत, अशा शब्‍दांत ‘इंडियन ओव्‍हरसीज काँग्रेस’चे (भारतीय विदेशी काँग्रेसचे) अध्‍यक्ष सॅम पित्रोदा यांनी टेक्‍सासमधील एका कार्यक्रमात बोलतांना काँग्रेसेचे नेते राहुल गांधी यांच्‍यावर स्‍तुतीसुमने उधळली.

Bangladesh Crisis Pak N US Connection : आंदोलनाच्या नेत्यांनी कतारमध्ये पाकिस्तानी आणि अमेरिकी अधिकारी यांची घेतली होती भेट !

अमेरिका आणि पाकिस्तान भारताचेही शत्रूच आहेत. त्यामुळे भारताने या देशांत कारवाया करणे आवश्यक आहे. आक्रमण हेच बचावाचे प्रमुख शस्त्र आहे, हे लक्षात घ्यायला हवे !

Venezuelan President Plane Seized : अमेरिकेने जप्त केले व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचे खासगी जेट विमान

‘हे विमान फसवेगिरीने खरेदी करण्यात आले होते’, असा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेचे अधिकारी व्हेनेझुएलामधून हे विमान अमेरिकेत घेऊन आले.

12th India Festival Wisconsin : अमेरिकेत ‘स्पिन्डल इंडिया’च्या वतीने ‘१२ वा भारत महोत्सव व्हिस्कॉन्सिन’ साजरा !

हिंदु संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न !
राजकीय नेत्यांकडून कौतुक !