लॉस एंजेलिस (अमेरिका) – बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू, बौद्ध आणि आदिवासी यांचा वंशविच्छेद होत आहे. अशा परिस्थितीत आपण शांत बसू शकत नाही. त्यांचा वंशविच्छेद रोखण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन ‘केपीसी ग्रुप ऑफ कंपनीज’चे संस्थापक अध्यक्ष काली प्रदीप चौधरी यांनी दिले. २६ ऑक्टोबरला येथे ‘बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू, बौद्ध आणि आदिवासी यांचा नरसंहार’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, अशी माहिती ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’ने ‘सनातन प्रभात’ला दिली आहे.
‘बांगलादेशत हिंदु बुद्धिस्ट अँड ख्रिश्चन युनिटी काऊंसिल’, ‘वर्ल्ड हिंदू फेडरेशन’, ‘ह्युमन राईट्स काँग्रेस फॉर बांगलादेश मायनॉरिटीज’ आणि ‘वर्ल्ड बुद्धिस्ट फेडरेशन’ यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले होते. अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती हे या परिषदेचे सहअध्यक्ष होते. स्वामी शुभानंद पुरी हे संमेलनाचे संयोजक, तसेच सूत्रधार होते. या परिषदेत जगभरातील विविध संघटनांचे नेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाकिस्तानचे धार्मिक नेते स्वामी रामनाथ मिश्रा, बांगलादेशाचे चिन्मयकृष्ण दास ब्रह्मचारी, अमेरिकेतील बिपुलानंद थेरो हेसुद्धा यांची उपस्थितीही परिषदेला लाभली.
International Conference on Ethnic Cleansing of Minorities in Bangladesh
The World Hindu Federation European Chapter hosted a conference in Los Angeles (Oct 26-27, 2024) to address:
– Brutal attacks on Hindus, Buddhists, and Adibasi Tribals
– Forced conversions and temple… pic.twitter.com/uk2GwV1uex— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 30, 2024
या परिषदेला अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती, मानवाधिकार अधिवक्ते रिचर्ड एल्. बेन्किन, धीमान देव चौधरी, टर्नी अशोक कर्माकर, श्रद्धानंद सीतल, श्यामल मुझुमदार, डॉ. कांदा स्वामी, आशु मोंगिया, रिचा गौतम, स्वीडन येथील चित्रा पॉल, बांगलादेशातील अधिवक्ता राणा दासगुप्ता, फ्रान्स येथील दीपन मित्रा इत्यादी वक्त्यांनी संबोधित केले.
या वेळी बोलतांना सर्वांनी बांगलादेशातील हिंदू, बौद्ध आणि आदिवासी यांच्यावरील क्रूर आक्रमणे, मंदिरे आणि मूर्तींची तोडफोड, हिंदू, बौद्ध अन् आदिवासी मुलींचे अपहरण, बलात्कार आणि धर्मांतर, घरांची जाळपोळ, मालमत्ता बळकावणे यांविषयी चिंता व्यक्त केली. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीविषयी जगभरातील हिंदूंना पुष्कळ काळजी असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व वक्त्यांनी बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांना अल्पसंख्यांकांवरील अत्याचार थांबवण्याची आणि त्यांचे मानवाधिकार सुनिश्चित करण्यासाठी ठोस पुढाकार घेण्याची मागणी केली.
अमेरिकेला शांततापूर्ण, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष बांगलादेश हवा आहे ! – राजा कृष्णमूर्तीअमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती म्हणाले की, बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या छळावरून केवळ तेच नव्हे, तर अमेरिकी काँग्रेसचे सर्व सदस्य चिंतेत आहेत. अमेरिकेला शांततापूर्ण, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष बांगलादेश हवा आहे. |