अवाजवी वीजदेयकांच्या विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सरकारला जाग न आल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल.

सिंधुदुर्गात १३ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४१ झाली आहे.

एक सेल्फी (स्वतःच स्वतःचे काढलेले छायाचित्र) सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत काढा !- सतीश साखळकर, नागरिक विकास मंच

नागरिक विकास मंचच्या सतीश साखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना निवेदन पाठवून एक सेल्फी सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत काढा. या रस्त्याच्या पाहणीसाठी दौरा करा’, असे आवाहन केले आहे.

राज्यशासनाकडून नवीन एकात्मिक बांधकाम नियमावली संमत

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीचा कोल्हापूरलाही लाभ होणार असून २३ मजली इमारतीला अनुमती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुण्यात कोरोना प्रतिबंधाचे नियम न पाळणार्‍या व्यावसायिकांवर कारवाईचे आदेश

शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्यावसायिक आस्थापने, तसेच सार्वजनिक ठिकाणी केले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी काढले आहेत.

कोल्हापूर येथील नागरिकांच्या दैनंदिन तक्रार निवारणासाठी महापालिकेची ‘टोल फ्री’ सुविधा

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने १८००-२३३-१९१३ या ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधा चालू केली असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त

कार्तिकी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा होणार नसली, तरी शहर आणि परिसर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अयोध्येतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असे नाव !

अयोध्येत सिद्ध करण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या’ असे नाव देण्यात येणार आहे.

राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पांजरपोळ येथे गोपूजन आणि गायींना चारा वाटप

श्री. राजेश क्षीरसागर यांच्यासह पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

व्यावसायिक वाहनांच्या रस्ताकरात निम्याने कपात करण्यास गोवा मंत्रीमंडळाची मान्यता

व्यावसायिक वाहनांसाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत रस्ताकरामध्ये ५० टक्के घट करण्यात आली आहे.