राज्यशासनाकडून नवीन एकात्मिक बांधकाम नियमावली संमत

कोल्हापुरात २३ मजली इमारती बांधता येणार

कोल्हापूर – राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीस २४ नोव्हेंबर या दिवशी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी संमती दिली. या नवीन नियमावलीचा कोल्हापूरलाही लाभ होणार असून २३ मजली इमारतीला अनुमती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यात अधिकचे बांधकाम क्षेत्र निर्माण होऊन अल्प दरात निवासस्थाने उपलब्ध होणार आहेत. यापुढे छोट्या घरांसाठी (१५०० चौरस फूट) अनुमतीची आवश्यकता रहाणार नाही. केवळ नकाशे देऊन शुल्क भरले की, तीच अनुमती म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. नवीन नियमावली संमत झाल्यासाठी कोल्हापूरचे क्रेडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव रवी किशोर माने, महाराष्ट्र खजानीस गिरीश रायबागे, सहसचिव महेश यादव यांनी समाधान व्यक्त केले आहे.