
कोल्हापूर, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. सकाळी श्री. राजेश क्षीरसागर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांनी श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. यानंतर शिवसेना राजारामपुरी विभागाच्या वतीने क्षीरसागर दाम्पत्याच्या हस्ते पांजरपोळ येथे गोमातेचे पूजन करून तेथील गाईंना डाळ, गूळ, चारा वाटप करण्यात आले. या वेळी युवा नेते श्री. ऋतुराज क्षीरसागर, शिवसेना विभागप्रमुख मंदार तपकिरे, सौ. अनुजा मंदार तपकिरे, सर्वश्री दीपक चव्हाण, अश्विन शेळके, अंकुश निपाणीकर, दादू शिंदे उपस्थित होते.
Assam Flood : आसाममध्ये महापूर : ४१ जणांचा मृत्यू !
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
न्यायालयाच्या दंडात्मक कारवाईनंतरही छत्रपती शिवाजी पथावर मासेविक्री चालूच !
Cockroach Party Sets Condition : चर्चेसाठी जंतरमंतरवर या किंवा सार्वजनिक ठिकाणी बैठक घ्या !