कोल्हापूर जिल्ह्यात १३५ पाणीपुरवठा योजना रखडल्या !

राजकीय साठमारीमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना प्रलंबित रहात असतील, तर जनतेच्या कराची होणारी उधळपट्टी कधीच थांबणार नाही.

मुंबई-गोवा महामार्गावर लावण्यात आलेल्या माहितीदर्शक फलकांवर व्याकरणाच्या अनेक चुका !

पाट्याटाकूपणे काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करणे आवश्यक !

सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीची सद्य:स्थिती

दळणवळण बंदीमध्ये शिथिलता आली, याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असे नाही, हे जिल्ह्यात वाढणार्‍या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येवरून लक्षात येते. जनतेने कोरोनाविषयीच्या शासकीय आणि वैद्यकीय नियमांचे पालन करणेच योग्य !

राज्यातील ‘जलक्रीडा’ चालू करण्याविषयी लवकरच आदर्श कार्यप्रणाली ! – अस्लम शेख, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांमध्ये पर्यटन व्यवसायाला अनुकूल वातावरण आहे. रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता या क्षेत्रामध्ये आहे.

हे शेतकर्‍यांचे आंदोलन नसून धनदांडग्या दलालांचे आंदोलन ! – नितीन फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष, गोवा सुरक्षा मंच

शेतकर्‍यांच्या नावाखाली पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला गोवा सुरक्षा मंचचा विरोध

तम्नार वीज प्रकल्पाला मोले ग्रामपंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती न्यायालयाकडून रहित

सांगोड येथे उभारण्यात येणार्‍या तम्नार वीजप्रकल्पाला मोले पंचायतीने दिलेली बांधकाम अनुज्ञप्ती उच्च न्यायालयाने रहित केली आहे.

‘फायझर’ने भारताकडे मागितली कोरोनावरील लसीची विक्री करण्याची अनुमती !

अशी मागणी करणारे ‘फायझर’ हे पहिले औषधनिर्मिती करणारे आस्थापन ठरले आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटीश सरकारने तसेच बहारीनमध्येही ही लस वापरण्यास संमती देण्यात आली आहे.

महिला आणि बालके यांची अनैतिक मानवी वाहतूक रोखण्यासाठी राज्यात आणखी २४ प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय

महिला आणि बालक यांच्यावरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

कामकाजात मराठी भाषेचा उपयोग करत नसल्यावरून राज्यशासनाकडून कोकण रेल्वे प्रशासनाकडे विचारणा

केंद्रशासनाच्या त्रिभाषा सूत्रानुसार कार्यालयीन कामकाजामध्ये हिंदी आणि इंग्रजी यांसह राज्याच्या प्रादेशिक भाषेचा वापर करणे कायद्याने बंधनकारक आहे.  

मुंबई विमानतळावर कोरोना चाचणीस असहकार्य करणार्‍या प्रवाशांवर गुन्हा नोंदवणार ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महानगरपालिका

कोरोनाची चाचणी करण्यास असहकार्य करणार्‍या प्रवाशांवर गुन्हा नोंदवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे