|
पुणे – वानवडी भागातील एका देशी मद्याच्या दुकानदाराकडून २६ नोव्हेंबर या दिवशी ७ सहस्र रुपयांची लाच घेतांना पुणे शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आनंदा काजळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया वानवडी पोलीस ठाण्यात चालू आहे.
दळणवळण बंदीच्या काळात ४ मासांचा हप्ता न दिल्याने काजळे यांनी या प्रकरणातील तक्रारदाराला हप्ता देण्याची मागणी केली. तक्रारदाराने त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.