देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील एक अनमोल सद्गुरुरत्न सद्गुरु राजेंद्र शिंदे !
सद्गुरु राजेंद्रदादांच्या संदर्भात प्रकाशित झालेल्या लिखाणातून ‘सद्गुरु राजेंद्रदादा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे प्रतिरूप आहेत’, असे वाटते. सद्गुरु दादांचे प्रेमभावाने बोलणे, आपुलकीने विचारपूस करणे, त्यांच्या नेत्रांतून दिसून येणारी प्रीती पाहून साधक अगत्याने त्यांचे बोल आनंदाने ऐकत असतात.