‘गुरुदेवांना एखाद्या साधकाने लिहिलेला लेख किंवा कविता आवडली, तर ते त्याला ‘प्रसाद’ पाठवून त्याचे कौतुक करतात. प्रत्यक्षात ते सारे त्यांनीच सुचवलेले असते; पण साधकांना आनंद आणि प्रेम देणे, यांसाठी ते सतत प्रयत्नरत असतात. त्यांच्या कृपाछत्राखाली असल्याने माया सोडतांना संघर्ष झाला नाही किंवा कधी संघर्ष झाला, तरी तेच मला दिशा देऊन माझ्या जन्माचा उद्देश सांगतात आणि माझा साधनेचा प्रवास करवून घेतात. हे केवळ सनातनच्या साधकांविषयी नाही, तर अखिल मानव जातींविषयीही त्यांना असेच प्रेम वाटते. ‘प्रत्येकाने ईश्वरप्राप्ती करावी’, यांसाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. याविषयी त्यांनीच सुचवलेल्या ओळी पुढे देत आहे.’
गुरुसाई (टीप) आतूनच ज्ञान मज देती ।
मग प्रसाद देऊन चैतन्य पाठवती ।। १ ।।
माझ्यासाठी साईनाथ काय काय करती ।
वर्णावी तेवढी थोडी असे गुरुकृपेची महती ।। २ ।।
कलियुगी या ‘माया’ झाली मोठी ।
जन सारे वेडावून तिच्या मागे हो धावती ।। ३ ।।
जन्म माझा झाला कारणे ईश्वरप्राप्ती ।
गुरुसाई माझे सतत हे सांगती ।। ४ ।।
माध्यमे नाना शोधूनी जगा ज्ञान देती ।
ऐसे साई कृपावंत सार्यांना उद्धरती ।। ५ ।।
टीप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले.
– सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ३७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा. (२७.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |