इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांतर्गत कुदळवाडी (पिंपरी) येथे ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ कार्यान्वित !

इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडून कुदळवाडी येथे प्रतिदिन ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (ई.टी.पी.) कार्यान्वित करण्यात आला आहे.

पुणे येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद !

काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. देहली-हरियाणा सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात प्राध्यापक भरतीसाठी ५ सहस्र अर्ज !

पुणे विद्यापिठाच्या विविध विभागांतील प्राध्यापकांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.विविध विभागांतील प्राध्यापक पदाच्या १११ जागांसाठी ५ सहस्र ५०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक म्हणजे १ सहस्र ३८ अर्ज आले आहेत.

सातारा येथे पोलिसांना वेळीच संपर्क केल्याने ‘ऑनलाईन’ फसवणूक रोखता आली !

‘ऑनलाईन’ फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !

चुकून वातानुकूलित डब्यात चढलेल्या महिलेला तिकीट तपासनीसाने गाडीबाहेर ढकलले !

अशा असंवेदनशील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फडणवीस यांचा माझ्यावर आक्रमण करण्याचा डाव ! – मनोज जरांगे पाटील, आंदोलनकर्ते

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून माझ्यावर आक्रमण करण्याचा डाव आखला होता. हा प्रयोग छत्रपती संभाजीनगरमध्येच होणार होता

यापुढे पू. भिडेगुरुजी यांच्यावर कुणी आक्रमण केल्यास धारकरी ‘जशास तसे’ उत्तर देतील ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे २९ फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील नियोजित कार्यक्रम संपवून धुळे येथे जात असतांना काही विचारशून्य, पळपुट्या जमावाने पू. भिडेगुरुजींच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच गाडीला आडवे येऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

अकोला येथे ४८ ट्रक गहू गायब प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकार्‍यांसह ७ आरोपींना शिक्षा !

सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात विक्रीसाठी असलेले ४८ ट्रक धान्य वर्ष  १९९९ मध्ये गायब झाले होते. घडलेल्या या प्रकरणाचा २४ वर्षा नतर निकाल लागला असून दोषी आढळलेल्या तत्कालीन निवासी ७ शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी देणारा सातारा येथून कह्यात !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍या मुख्य आरोपीला सातारा येथील सदर बझार येथून २ मार्च या दिवशी अटक केली. किंचक नवले असे या आरोपीचे नाव असून त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हैदर शेखने अमली पदार्थ विक्रीतील पैसे ‘हवाला’द्वारे देहलीला पाठवले ! – पुणे पोलीस

‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारा ३४० किलो कच्चा माल गुन्हे शाखेच्या पथकाने २ मार्च या दिवशी विश्रांतवाडी येथून जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या कच्च्या मालामध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश आहे. हा माल एका टेंपोमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.