सातारा येथे पोलिसांना वेळीच संपर्क केल्याने ‘ऑनलाईन’ फसवणूक रोखता आली !

सातारा, ३ मार्च (वार्ता.) – येथील एका दांपत्याला विद्युत विभागाच्या वतीने संदेश पाठवून प्रलंबित वीजदेयक भरण्यास सांगितले. ती वेळेत न भरल्यास वीज जोडणी तोडणार असल्याचेही संदेशात सांगितले. संबंधित व्यक्तीने संदेश आलेल्या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क केला असता त्यांना त्यांचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि अधिकोष माहिती (बँक डिटेल्स) मागण्यात आले. ही माहिती दिल्यावर भ्रमणभाष काही सेकंदांत हॅक झाला. संबंधिताने पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी त्या व्यक्तीला इंस्टाग्राम, फेसबुक यांवरील खाती पुसून टाकण्यात आली. सर्व पासवर्ड पालटण्यास सांगून लोकेशन बंद करण्यास सांगितले. यामुळे पुढील अनर्थ टळला. विद्युत विभागाने असा कोणताही संदेश पाठवला नसल्याचे निष्पन्न झाले.

संपादकीय भूमिका 

‘ऑनलाईन’ फसवणूक करणार्‍यांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !