चर्चिल आलेमाव यांचे डोके फिरले आहे ! – नितीन फळदेसाई, राष्ट्रीय बजरंग दल

राष्ट्रवादी काँग्रेसचे चर्चिल आलेमाव यांचे डोके फिरले आहे. त्यांची तब्येत कधी कधी अशी बिघडते की, ते काय बोलतात, तेच त्यांना समजत नाही.

नागपूर येथे लाचप्रकरणी २ अधिकार्‍यांच्या घरातून २ कोटी रुपयांची रोकड जप्त !

भरघोस वेतन आणि शासनाच्या सर्व सुविधा असतांनाही लाच मागणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना बडतर्फ करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची, तसेच फौजदारी कारवाई केली पाहिजे. तसे केल्यासच धास्ती वाटून भ्रष्टाचार न्यून होईल !  

शिवडी-न्हावाशेवा पूल चालू करा, अन्यथा आम्ही चालू करू ! – आदित्य ठाकरे, आमदार

‘उद्घाटनासाठी वेळ नाही, तसेच देहलीकडून दिनांक मिळत नाही, अशी सरकारची स्थिती आहे. तुम्हाला देहलीला उत्तर द्यायचे आहे; परंतु मला माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायचे आहे’, असे ते या वेळी म्हणाले.

Ayodhya Rammandir Consecration : श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तिरुपति मंदिराकडून १ लाख लाडू अर्पण !

आमच्या बोर्डाचा प्राथमिक उद्देश हा हिंदु धर्म आणि त्याची संस्कृती अन् मूल्ये यांचा प्रचार-प्रसार करणे आहे. श्रीरामजन्मभूमीत होणार्‍या पूजेचा आम्हीही एक भाग बनणे, हे आमचे सौभाग्य आहे.

गुन्हा घडलेल्या ‘लॉज’चा परवाना रहित करा ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, भाजप

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे ३ शाळकरी अल्पवयीन मुलींच्यावर झालेल्या अत्याचार प्रकरणात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि पीडित कुटुंबियांची भेट घेतली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाचा गोंधळ अजूनही चालूच !

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणार्‍या परीक्षा विभागातील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

मराठा-ओबीसी हा वाद कुणीतरी घडवत असून आपण गाफील आहोत ! – राज ठाकरे, मनसे

महाराष्ट्र एकसंघ राहू नये; म्हणून सगळे प्रयत्न करत आहेत. आम्ही गाफील आहोत. ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

पुणे येथील ‘बालगंधर्व रंगमंदिरा’ची जुनी इमारत पाडणार ! – नितीन करीर, मुख्य सचिव

बालगंधर्व रंगमंदिर जुने झाल्याने तेथे नवे नाट्यगृह बांधले जावे, अशी नाट्य, चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंतांची इच्छा होती; ‘परंतु त्याचा व्यावसायिक वापर होऊ नये’, असेही त्यांचे म्हणणे होते

Anti-National Demand : बिहारमधील धर्मांध प्राध्यापकाने केली भारतीय मुसलमानांसाठी स्वतंत्र मातृभूमीची राष्ट्रघातकी मागणी !

अशांनी क्षमा मागितली, तरी त्यांच्या मनामध्ये भारताची आणखी फाळणी करण्याचेच विचार आहेत, हे स्पष्ट होते ! अशांना भारतातून दिवाळखोर होणार्‍या पाकिस्तानमध्ये पाठवणे, हीच मोठी शिक्षा असेल !

नाशिक येथे अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी न्यायालय प्रशासनाला १ लाख रुपये दंडाची नोटीस !

नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या चिंचेच्या वृक्षाची विनाअनुमती छाटणी करण्यात आली. त्यासाठी महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाने न्यायालय प्रशासनाला १ लाख रुपयापर्यंतची दंडाची नोटीस बजावली आहे.