भारतीय स्त्रियांची ज्ञानपरंपरा (वैदिककाल ते अर्वाचीनकाल) !
अर्वाचीन कालखंडापर्यंत पोचण्यापूर्वी प्राचीन भारतातील वैदिक काळातील स्त्रियांचे ज्ञानक्षेत्रातील योगदान आपल्याला लक्षात घ्यावे लागते. आपली प्रज्ञा, अंतर्दृष्टी आणि आचरण यांच्या उत्कर्षाने महिलांनी वैदिक संस्कृतीला प्रदात्त रूप देण्यात सहकार्य केले.