लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच महायुतीचा महामेळावा होणार आहे. १४ जानेवारीला एकाच जिल्ह्यात ३५ ठिकाणी महायुतीचे मेळावे होणार आहेत. फेब्रुवारीच्या शेवटी महामेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

एस्.एस्.सी. (१० वी च्या) सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढला ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

एस्.एस्.सी. बोर्डाच्या धरतीवरील एस्.एस्.सी. सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे केले.

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ तात्काळ रहित करा ! – हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा कायदा हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या विषयातील एक अन्यायकारक आणि काळा कायदा आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ हा कायदा तात्काळ रहित करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केली.

२८ जानेवारीला कोल्हापूर येथे शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन ! – राजेश क्षीरसागर

मुख्यमंत्र्यांचे राज्यभर १६ पदाधिकारी मेळावे पार पडणार आहेत. शिवसेनेचे सर्व खासदार पुन्हा निवडून आणण्याच्या उद्देशाने हे मेळावे घेण्यात येणार आहेत.

‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित !

– ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३’ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला असून त्यात २ कोटी रुपयांचे पारितोषिक महापालिकेला मिळणार आहे.

रेसकोर्सवर एकही वीट रचू देणार नाही ! – आदित्य ठाकरे

प्रसिद्ध महालक्ष्मी येथील रेसकोर्स सरकार बांधकाम व्यावसायिकांना विकायला निघाले आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच ‘शिवसेना त्या जागेवर एकही वीट रचू देणार नाही’, अशी चेतावणी त्यांनी दिली.

तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !

‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : धर्मतेजाचे किरण !

हिंदुद्वेष्ट्यांना योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे धडा शिकवणारे संपादक किरण शेलार यांचे अभिनंदन !

लुप्त झालेला वासुदेव !

वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून पांडुरंगावरील अभंग, गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे.