मुंबई – एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेलेल्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका केली होती. ७ मार्च या दिवशी यावर सुनावणी झाली. या वेळी सर्वाेच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांकडून निकालाची कागदपत्रे मागवली असून याविषयीची पुढील सुनावणी ८ एप्रिल या दिवशी होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वतीने युक्तीवाद करतांना ज्येष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्यामुळे सुनावणी वेळेत झाली नाही, तर हे प्रकरण निरस्त होईल, असे सिब्बल यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांची बाजू मांडतांना ज्येष्ठ अधिवक्ता हरिश साळवे यांनी उद्धव ठाकरे यांनी सादर केलेली कागदपत्रे विश्वासार्ह नसल्याचे म्हटले.