तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना साधकाला गुरुकृपेने सुचलेली कवने !

वर्ष २०२४ मध्ये सप्टेंबर मासात पितृपक्षाला आरंभ झाल्यापासून मला तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास होऊ लागला. नवरात्रीला आरंभ होताच पुढील काही दिवसांत मला काही कविता सुचल्या. त्या श्री मां जगदंबा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करतो.

तेनाली (आंध्रप्रदेश) येथे वेदांतशास्त्र महापरीक्षेत यश संपादन करणारे श्री. दत्तानुभव (राघव) गुलाब टेंग्से यांचे पैंगीणग्रामी स्वागत !

पैंगीण येथील श्री. दत्तानुभव गुलाब टेंग्से यांनी तेनाली येथे शृंगेरी मठाचे शंकराचार्य आणि अन्य वेदांतशास्त्र पंडित यांनी घेतलेल्या वेदांतशास्त्र महापरीक्षेत उत्तीर्ण होण्याबरोबरच देशात पहिले येण्याचा मान मिळवून पैंगीण ग्रामासह भारतीय संस्कृतीचा मुकुटमणी होण्याचा मान मिळवला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेशामधील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना मध्यप्रदेशामधील साधकांना आलेल्या अनुभूती १८ नोव्हेंबर या दिवशी पाहिल्या आज पुढील भाग पाहूया.

आश्रम परिसरात असणार्‍या मंदिरांना प्रदक्षिणा घालतांना चैतन्य मिळून त्रास न्यून होत असल्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘सप्टेंबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत मी ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रिये’साठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होते. त्या वेळी सकाळी मला ‘थकवा, निराशा, नकारात्मक विचार येणे’, असे त्रास व्हायचे. अशा वेळी आश्रम परिसरातील मंदिरांभोवती प्रदक्षिणा घातल्यावर मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

समष्टी प्रारब्धाचा व्यष्टी प्रारब्धावर होणारा परिणाम !

समष्टी प्रारब्धामुळे एखादी घटना घडते, त्या वेळी ज्यांचे मंद व्यष्टी प्रारब्ध असेल, त्यांच्यावर २० – ३० टक्के परिणाम होतो. ज्यांचे मध्यम प्रारब्ध असेल, त्यांचावर ५० – ६० टक्के परिणाम होतो; याउलट ज्यांचे तीव्र प्रारब्ध असेल, त्यांच्यावर थेट परिणाम होऊन विविध घटनांमुळे त्यांचा मृत्यू होतो.

प.पू. भक्तराज महाराज यांचे नारायणगाव येथील शिष्य शशिकांत मनोहर ठुसे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात साजरा !

मनोहरबाग (पठार) येथे रहाणारे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य (कै.) शशिकांत मनोहर ठुसे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम १८ नोव्हेंबर २०२४ या दिवशी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.

गोवा पोलिसांकडून मानवी तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त

गोवा पोलिसांनी बेकायदेशीर नोकरभरती संस्था चालवून त्या माध्यमातून भारतातून मस्कत येथे युवतींची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय जाळे गोवा पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे.

२१ ते २३ नोव्हेंबर या काळात पू. स्वामी स्वरूपानंद यांची व्याख्यानमाला ! – स्वामी दत्तराजानंद

कोल्हापूर येथील चिन्मय सेवा समितीच्या वतीने चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते पू. स्वामी स्वरूपानंद यांची २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत व्याख्यानमाला होत आहे.

अजित पवार यांनाही आम्ही भगवे करू ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री भाजप

अजित पवार यांच्यासमवेत आमची संपूर्ण विचारसरणी जुळली असती, तर त्यांचा वेगळा पक्ष कसा राहिला असता ? आम्ही आधीच घोषित केले आहे की, आमची आणि अजित पवार यांची राजकीय युती आहे. हळूहळू तेही आमच्या विचारांचे होतील.

कोरगाव (गोवा) पंचायतीच्या सरपंचपदी अब्दुल करीम यांची निवड केल्याने गावात तीव्र नापसंती !

सभेतील वक्ते प्रशांत राऊळ यांनी सभेत बोलतांना कोरगाव पंचायतीच्या सरपंचपदी अब्दुल यांना बसवून ४ पंचसदस्यांनी एका ‘कसाब’ची गावच्या प्रमुखपदी निवड केल्याचा आरोप केला.