धरणांतील जलसाठा ४० टक्क्यांवर !

महाराष्ट्रातील जलसंकट गंभीर होणार !

पुणे – राज्यातील एकूण धरणांपैकी अंदाजे ४० जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असून १८ हून अधिक धरणांमध्ये १० टक्क्यांहून न्यून पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वत्रची एकूण परिस्थिती पहाता सर्वच धरणांत सरासरी ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्यावरील पाण्याचे संकट गंभीर होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील वर्षीपेक्षा या वर्षी १४.१२ टक्क्यांनी पाणीसाठा अल्प असल्याने एकूणच पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांतील धरणांमधील पाणीसाठा पूर्णपणे संपला आहे. या भागातील काही धरणांचा अपवाद वगळता धरणे पूर्णपणे कोरडी पडली आहेत. उजनी धरणातील पाणीसाठा खालावला आहे. राज्यात जलसाठ्याचा सर्वाधिक फटका संभाजीनगर भागाला बसला असून या भागातील पाणीसाठा २५.१३ टक्के एवढाच शिल्लक आहे.

संपादकीय भूमिका

निसर्गपूरक विकास होत नसल्याचा परिणाम !

भूजल पातळी अल्प होत चालल्यामुळे सर्वांनीच पाणी योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक !