अंबाजोगाई (बीड) – कापूस व्यापारी अख्तर दस्तगीर पठाण आणि अलीम शहा यांच्यावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात ११ शेतकर्यांची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी नागपिंपरी येथील शेतकरी हनुमंत रुस्तुम मुंडे यांनी तक्रार दिली आहे.
कापूस व्यापारी अख्तर दस्तगीर पठाण आणि अलीम शहा हे दोन व्यापारी नागपिंपरी गावातून नेहमी कापूस खरेदी करत असत. त्यातून त्यांनी गावातील शेतकर्यांचा विश्वास संपादन केला. गत वर्षी या दोघांनी शेतकरी हनुमंत रुस्तुम मुंडे यांना दीपावलीपर्यंत पैसे घेणे थांबल्यास कापसाला प्रतिक्विंटल १० सहस्र रुपये भाव देण्याचे आमीष दाखवले; मात्र दीपावलीनंतरही पैसे दिले नाहीत. हनुमंत मुंडे यांच्यासह ज्ञानोबा भागवत मुंडे, ज्ञानोबा किसन कोल्हापुरे, बळीराम लक्ष्मण मुंडे, आत्माराम श्रीरंग मुंडे, नवनाथ व्यंकटी शिंदे, मारोती ग्यानबा भोसले, विष्णु पाटील-ढाकणे, रावण श्रीहरी मुंडे, बाबू रंगनाथ मुंडे आणि नवनाथ श्रीरंग मुंडे यांचा २१ लाख ६४ सहस्र रुपयांचा २२५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला; मात्र त्याचे पैसे दिले नाहीत.
संपादकीय भूमिकानेहमीच स्वत:ला अल्पसंख्य म्हणवून घेणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य कसे ? |