जगातील कोणतीही महिला ही माझी माता आहे, ही श्रद्धा हिंदु धर्मातील प्राणभूत तत्त्व आहे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी 

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचा दुसरा दिवस

पू. संभाजीराव भिडेगुरुजी 

 

सांगली, १६ ऑक्टोबर (वार्ता.) – संत तुकाराम महाराज यांनी ३ सहस्र ८७२ अभंग लिहिले असून सगळे उत्स्फूर्त आहेत. त्यातील एका अभंगात संत तुकोबाराय म्हणतात ‘पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें ॥’ याचा अर्थ परस्त्री ही माता रुक्मिणीसमान आहे, असे ते सांगतात. जगातील कोणतीही महिला ही माझी माता आहे, ही श्रद्धा हिंदु धर्मातील प्राणभूत तत्त्व आहे. ही श्रद्धा केवळ हिंदु धर्मात आहे, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री दुर्गामाता दौडीच्या दुसर्‍या दिवशी माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गामाता मंदिरासमोर धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.

दौडीच्या दुसर्‍या दिवशी पोलीस निरीक्षक मुकुंदराव कुलकर्णी, उद्योगपती धर्मेंद्र शेट्टी, सरकारी अधिवक्ता माधवराव कुलकर्णी, मानसोपचारतज्ञ डॉ. समीर गुप्ते यांसह धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरज येथे बुधवार पेठेतील सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन मंगावते यांना दौडीच्या प्रारंभी भगवा झेंडा घेण्याचा मान मिळाला.

श्री दुर्गामाता दौडीत भगवा झेंडा घेतलेले सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन मंगावते
सांगली येथे श्री दुर्गामाता दौडीत भगवा झेंडा घेतलेले पोलीस निरीक्षक मुकुंदराव कुलकर्णी शेजारी हणमतंराव पवार (उजवीकडे), तसेच अन्य