पुणे – ‘इस्त्रायल’ आणि ‘हमास’ या आतंकवादी संघटनेमध्ये चालू असलेल्या युद्धाचे पडसाद जगभर उमटत आहेत. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांनी शहरातील ‘ज्यू’ धर्मियांच्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. शहरातील लष्कर, कोरेगाव पार्क, वानवडी या भागांमध्ये ज्यू धर्मियांचे वास्तव्य आहे, तसेच लष्कर भागात ‘लाल देऊळ’ हे प्रसिद्ध प्रार्थनास्थळ आहे, त्याच्याही बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. स्थानिक पोलिसांना सतर्क रहाण्याची सूचनाही करण्यात आली आहे.