अशा पॅलेस्टाईन समर्थकांना भारतातून हाकलूनच लावायला हवे !
मुंबई – इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाच्या विरोधात आंदोलन करणार्या २ पॅलेस्टाईन समर्थकांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. रुचिर लाड आणि सुप्रीत रविश अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर विनाअनुमती आंदोलन करणे, सरकारी आदेशाची अवज्ञा करणे असे आरोप आहेत. परिसरात फेरी किंवा निषेध करण्याची अनुमती नसल्याने पोलिसांनी कारवाई केली. आंदोलनाचे आयोजक असलेल्या ‘रिव्होल्यूशनरी वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया’च्या ४ कार्यकर्त्यांना माटुंगा आणि मानखुर्द येथून आंदोलनापूर्वी कह्यात घेण्यात आले होते. आंदोलनाला विरोध करणार्या पोलिसांशी आंदोलनकर्त्यांनी वाद घातल्याचा पोलिसांचा आरोप आहे.