गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये सातारा पोलीस दलाने सतर्कता बाळगावी ! – शंभूराज देसाई

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी आतापासून बैठका घ्या. जे गुन्हेगार सतत गुन्हे करत आहेत, अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.

छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा नागरी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध !

बँकेच्या अपकारभारावर ‘आर्.बी.आय.’ने ताशेरे ओढले आहेत. ‘आर्.बी.आय.’च्या मान्यतेविना कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. निर्बंध २९ ऑगस्टपासून लागू झाले असून ६ मासांनंतर कारभाराचा आढावा घेतला जाईल.

नागपूर येथील मंदिर विश्वस्तांचा संघटितपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार !

‘परिसरातील सर्व मंदिरांना भेटी देऊन जवळीकता निर्माण करणे’  या विषयावरही चर्चा झाली. नागपूर जिल्ह्यातील सर्व मंदिर विश्वस्तांचे जिल्हास्तरीय मंदिर अधिवेशन घेण्याचे ठरले. यात येथील सर्वच मंदिर विश्वस्तांना सहभागी करून घेणार असल्याचे सांगितले.

जीवनातील प्रत्येक क्षणी संत साहित्याचा सहवास आवश्यक !  – ह.भ.प. चारूदत्तबुवा आफळे

संतांच्या हातून लिहिले गेलेले साहित्य परिसासारखे प्रभावी असते. त्यात मानवी जीवनाचे सोने करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळेच आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी संत साहित्याचा सहवास आवश्यक आहे, असे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारूदत्तबुवा आफळे यांनी सांगितले.

मेवात (हरियाणा), देहली आणि मणिपूर येथे हिंदूंना लक्ष्य करून हिंसाचार करणार्‍यांवर कारवाई करा ! – चंदगड येथ निवेदन

गेल्या काही मासांपासून एका मोठ्या षड्यंत्राद्वारे मणिपूर, देहली आणि मेवात (हरयाणा) येथे स्थानिक धर्मांध आणि राष्ट्रविरोधी लोकांकडून स्थानिक हिंदूंना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला आहे.

कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालय ८ वर्षांपासून पुरस्काराच्या निधीपासून वंचित !

‘राज्य सरकारने घोषित केलेल्या पुरस्काराची रक्कम सरकारकडून प्राप्त होत नसल्यामुळे हा पुरस्कार कसा द्यावा ? आणि त्यासाठी लागणार्‍या खर्चाचे काय ?’, असे प्रश्‍न कालिदास संस्कृत विश्‍वविद्यालयापुढे निर्माण झाले आहेत.

पितळी उंबर्‍याच्या आतून श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनास प्रारंभ !

मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने ३० ऑगस्टपासून भाविकांना पितळी उंबर्‍याच्या आतून श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन मिळण्यास प्रारंभ झाला. श्री महालक्ष्मीदेवीचे जवळून दर्शन घेता येत असल्याविषयी भाविकांनी समाधान व्यक्त केले.

दादागिरी आणि गांधीगिरी !

चीन भारताच्या किती आणि कशा कुरापती काढतो ? हे आता संपूर्ण जगाला ठाऊक आहे. आता त्याने भारताचा अरुणाचल प्रदेश त्याच्या मानचित्रात (नकाशामध्ये) दाखवून भारताला पुन्हा एकदा डिवचले आहे.

भिवंडी येथे मणी बनवणार्‍या कारखान्याला आग !

भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या प्लास्टिकचे मणी बनवणार्‍या कारखान्यास २९ ऑगस्टला भीषण आग लागली. या आगीत कारखाना जळून खाक झाला असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

चितावणीखोर वक्तव्य करणार्‍या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कायदेशीर कारवाई करा ! – ‘मी इचलकरंजीकर’ संघटनेच्या वतीने निवदेन

सुळकूड पाणी योजनेवरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘ही योजना झाल्यास रक्तपात होईल’, तर माजी आमदार के.पी. पाटील यांनीही कर्नाटकमधील नागरिकांना भडकवणारे विधान केले आहे.