पितळी उंबर्‍याच्या आतून श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनास प्रारंभ !

पितळी उंबर्‍याच्या आतून श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेणारे भाविक

कोल्हापूर – भाविकांना लवकरच श्री महालक्ष्मीदेवीचे पितळी उंबर्‍याच्या आतून दर्शन घेता येईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घोषित केले होते. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने तशी व्यवस्था पूर्ण झाल्यावर ३० ऑगस्टपासून भाविकांना पितळी उंबर्‍याच्या आतून श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन मिळण्यास प्रारंभ झाला. श्री महालक्ष्मीदेवीचे जवळून दर्शन घेता येत असल्याविषयी भाविकांनी समाधान व्यक्त केले.