छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा नागरी बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध !

५ लाखांपर्यंतची रक्कम परत मिळणार !

छत्रपती संभाजीनगर – ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने (आर्.बी.आय.ने) अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. संचालकांना निधीची उलाढाल, गुंतवणूक, कर्ज नूतनीकरण, नवीन ठेवी स्वीकारणे आदींवर बंदी आली आहे. यामुळे सहस्रो ठेवीदार चिंताग्रस्त झाले आहेत. ज्या ग्राहकांच्या ठेवी ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा अल्प रकमेच्या असतील, त्यांना ठेवी विमा दाव्याअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम कलम ८० नुसार परत मिळेल. बँकेच्या अपकारभारावर ‘आर्.बी.आय.’ने ताशेरे ओढले आहेत. ‘आर्.बी.आय.’च्या मान्यतेविना कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. निर्बंध २९ ऑगस्टपासून लागू झाले असून ६ मासांनंतर कारभाराचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे बँकेने म्हटले. तोपर्यंत बँकेचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू रहाणार आहे.