जीवितहानी नाही !
ठाणे, ३० ऑगस्ट (वार्ता.) – भिवंडी तालुक्यातील कांबे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या प्लास्टिकचे मणी बनवणार्या कारखान्यास २९ ऑगस्टला भीषण आग लागली. या आगीत कारखाना जळून खाक झाला असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कच्चा माल साठवलेला असल्याने आगीने उग्र रूप धारण केले होते. त्यामध्ये कारखान्याच्या छताचे पत्रेही तुटले. जेथे आग लागली होती, त्या बाजूचे शटर बंद असल्याने कामगारांनी दुसर्या गाळ्यातून बाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.