रुग्‍णालयात आवश्‍यक सुविधांची वानवा; खराब शवपेट्यांमुळे मृतदेह उघड्यावर !

भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्‍णालयात अनागोंदी कारभार चालू आहे. अपक्ष आमदार गीता जैन यांनी रुग्‍णालयाच्‍या व्‍यवस्‍थेचा आढावा घेण्‍यासाठी २८ ऑगस्‍टला ठाणे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक कैलास पवार यांना बोलावले होते.

ठाणे जिल्‍ह्यात ‘लंपी’ चर्मरोगाचा संसर्ग नाही ! – पशूसंवर्धन विभाग, ठाणे

ठाणे जिल्‍ह्यात सध्‍या ‘लंपी’ या चर्मरोगाचा संसर्ग झालेला नाही, असे ठाणे पशूसंवर्धन विभागाने स्‍पष्‍ट केले आहे. ‘लंपी’ चर्मरोग नियंत्रणासाठी जिल्‍ह्यात पशूसंवर्धन विभागासह अन्‍य यंत्रणा सिद्ध करण्‍यात आली आहे.

वाशी आणि तुर्भे येथे मोठ्या प्रमाणात लावलेले विज्ञापनांचे फलक अनधिकृत !

अशी मागणी का करावी लागते ? आयुक्‍त स्‍वतः कारवाई का करत नाहीत ?

कल्‍याण येथे मध्‍य रेल्‍वेच्‍या सिग्‍नलमधील बिघाडामुळे वाहतूक खोळंबली !

कल्‍याण येथे मध्‍य रेल्‍वेच्‍या सिग्‍नल यंत्रणेत २९ ऑगस्‍टला सकाळी बिघाड झाल्‍यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

‘संस्‍कृत’ एक अद़्‍भुत रचना होऊ शकणारी भाषा !

ज्‍या संस्‍कृतला इंग्रजांनी हेटाळले होते, त्‍याच संस्‍कृतमध्‍ये आजच्‍या काळातही लीलया रचना होत आहेत आणि त्‍याही कालानुरूप !’

वैदिक रक्षाबंधन उत्‍सव

दूर्वा, अक्षता (तांदूळ), केसर, चंदन आणि मोहरीचे दाणे या ५ वस्‍तूंची आवश्‍यकता आहे. या ५ वस्‍तूंना रेशमी कापडात घेऊन ते एकत्र बांधावे किंवा शिवावे. नंतर त्‍यात धागा गुंतवावा. अशा प्रकारे वैदिक राखी सिद्ध होते.

‘वसुधैव कुटुम्‍बकम् ।’, या भावाने प्रत्‍येक कर्म आणि व्‍यवहार करणे, म्‍हणजे खरे ‘रक्षाबंधन’ !

आज ३० ऑगस्‍ट या दिवशी रक्षाबंधन आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून ओवाळते आणि भाऊ या मंगलप्रसंगी तिच्‍या सर्वांगाने रक्षणासाठी कटीबद्ध होतो.

भाऊ आणि बहीण यांच्‍यातील अतूट प्रेमाची साक्ष असलेला ‘रक्षाबंधन’ सण !

‘रक्षाबंधनाच्‍या दिवशी भावाच्‍या रक्षणाचा संकल्‍प साकार करण्‍यासाठी बहीण भावाच्‍या घरी येते. राखीचा धागा छोटासा असतो; परंतु बहिणीचा संकल्‍प त्‍यात अद़्‍भुत शक्‍ती भरून टाकतो. संकल्‍प जितके निःस्‍वार्थ, निर्दोष आणि पवित्र असतात, तितकाच त्‍यांचा प्रभाव वाढतो.

रक्षाबंधनाचा आध्‍यात्मिक उद्देश !

‘रक्षाबंधनाच्‍या दिवशी बहीण भावाला राखीचा धागा बांधते. सख्‍खे बहीण-भाऊ असतील अथवा चित्तात ज्‍याच्‍याप्रती भावाचा किंवा बहिणीचा भाव असेल, ते हे पर्व साजरे करतात.

श्रावण मासात अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !

‘१७.८.२०२३ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ झाला आहे. या काळात नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्‍ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या दृष्‍टीने पुढील प्रयत्न करता येतील.