आंबिवली (कल्‍याण) येथील ‘एन्.आर्.सी.’ आस्‍थापनाच्‍या आवारातील रोहित्राजवळ स्‍फोट

कल्‍याण-डोंबिवली महानगरपालिकेच्‍या हद्दीतील मोहने भागात नॅशनल रेयॉन आस्‍थापन (‘एन्.आर्.सी.’) अनेक वर्षांपासून बंद स्‍थितीत आहे. एका कंत्राटदाराच्‍या माध्‍यमातून तेथील आवारातील रोहित्राची दुरुस्‍ती चालू असतांना आगीचा भडका उडून मोठा स्‍फोट झाला.

जे.जे. रुग्‍णालयात ‘यकृत रोपण’ सुविधा उपलब्‍ध करून देणार ! – हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षणमंत्री

सर्वसामान्‍य रुग्‍णांना परवडेल, अशा दरात सर जे.जे. रुग्‍णालयात ‘यकृत रोपण’ सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याविषयी २९ ऑगस्‍ट या दिवशी मुश्रीफ यांनी आढावा बैठक घेतली.

कोटी कोटी प्रणाम !

सनातनने ओळखलेल्‍या आणि सनातनच्‍या कार्याशी एकरूप झालेल्‍या बांदा, जिल्‍हा सिंधुदुर्ग येथील पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा आज ७३ वा वाढदिवस !
३१ जुलै २०१५ या दिवशी संतपदी विराजमान

हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठीच प्रयत्नरत रहाणे आवश्यक !

‘हिंदूंनो, केवळ राममंदिरासाठी नव्हे, तर हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्नरत रहा, नाहीतर आतंकवादी राममंदिर नष्ट करतील !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍ट’च्‍या माध्‍यमातून देण्‍यात आलेल्‍या राख्‍या सैनिकांचे मानसिक बळ वाढवतील ! – बंडू कात्रे, सुभेदार मेजर

केवळ युद्धाच्‍या वेळी नव्‍हे, तर अहोरात्र देश संरक्षणासाठी कार्यरत  असणार्‍या सैनिकांचे स्‍मरण ठेवून माता-भगिनींनी ‘स्‍वामी विवेकानंद ट्रस्‍ट’च्‍या माध्‍यमातून पाठवलेल्‍या राख्‍यांमुळे सैनिकांचे मनोधैर्य नक्‍कीच वाढणार आहे, असे मनोगत सुभेदार मेजर बंडू कात्रे यांनी व्‍यक्‍त केले.

भारताच्‍या ‘चंद्रयान-३’ मोहिमेत ‘कूपर समुहा’च्‍या क्रँकशाफ्‍टचा उपयोग ! – खासदार उदयनराजे भोसले, भाजप

भारताच्‍या ‘चंद्रयान-३’ मोहिमेत ‘कूपर उद्योग समुहा’च्‍या क्रँकशाफ्‍टचा (क्राँप्रेसर यंत्रात वापरले जाणारे उपकरण) उपयोग करण्‍यात आला आहे. यामुळे पुन्‍हा एकदा कूपर समुहाचे देशाच्‍या वाटचालीतील योगदान अधोरेखित झाले आहे.

‘शककर्ते शिवराय’ हा ग्रंथ लिहिण्‍यासाठी सद़्‍गुरूंचा आशीर्वाद आणि श्री गणेशाची कृपा लाभली ! – सद़्‍गुरुदास विजयराव देशमुख

शिवकथाकार श्री. विजयराव देशमुख लिखित ‘शककर्ते शिवराय’ ग्रंथाची ५ वी आवृत्ती, ‘राजा शंभू छत्रपती’ ग्रंथाची ५ वी आवृत्ती आणि ‘सूर्यपुत्र’ या ग्रंथाची ३ री आवृत्ती या ग्रंथांचे प्रकाशन कोथरूड येथे झाले.

धनक्रांती !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ च्‍या ऑगस्‍ट मासामध्‍ये ‘पंतप्रधान जनधन योजना’ चालू केली. जे अत्‍यंत गरीब किंवा दारिद्य्ररेषेखालील आहेत, असे सर्व कामगार, ग्रामीण भागांतील नागरिक आदींसाठी अधिकोषामध्‍ये खाते काढण्‍याची ही योजना होती.