समाजापासून वेगळे ठरू, अशा पद्धतीने न्यायमूर्तींनी विशेष सुविधांचा लाभ घेऊ नये !
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी देशातील सर्व उच्च न्यायालयांतील मुख्य न्यायमूर्तींना सुनावले !
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी देशातील सर्व उच्च न्यायालयांतील मुख्य न्यायमूर्तींना सुनावले !
महाराष्ट्रात डुप्लिकेट मद्य सिद्ध होत आहे. यामुळे महाराष्ट्रात मद्याचा महसूल बुडतो. उत्तर प्रदेश, देहली, पंजाब येथील राज्यांत मद्यापासून मिळणारा महसुलाचा अभ्यास आम्ही केला आहे. याविषयीचा अहवाल आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांपुढे सादर करणार आहोत.
मराठवाड्यात १०० दिवसांत १७०० शेतकर्यांनी आत्महत्या केल्या !
तंबाखूजन्य पदार्थावरील बंदीचा कायदा होतो, त्या ठिकाणीच तंबाखूजन्य पदार्थ सापडणे, याकडे सरकारने लक्ष द्यावे !
ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टला १९ जुलै या दिवशी टाळे ठोकले. शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) माजी मंत्री अनिल परब आणि सदानंद कदम यांच्याशी संबंधित साई रिसॉर्टच्या बांधकामात ‘सी.आर्.झेड.’ कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे.
चिपळूण आणि खेड येथील पावसाचा जोर न्यून होताच येथील पूर ओसरल्यामुले विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्ववत् होत आहे. कुंभार्ली आणि आता परशुराम घाटातून दुहेरी वाहतूक चालू करण्यात आली आहे.
दरड प्रवण गावांवर विशेषत: डोंगराच्या पायथ्याशी असणार्या गावांवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने लक्ष द्या. ग्रामस्थांशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा, अशा सूचना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिल्या.
राज्यात शिक्षणाचा हक्क कायद्यामध्ये कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर सुधारणा करण्यात येणार आहे. शासन नवीन संकल्पेवर दर्जेदार शिक्षण मिळतील, अशा शाळांची निर्मिती करणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना २१ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.
पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने सदर मार्ग जाण्या-येण्यासाठी धोकादायक होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये दरड कोसळून मानवी जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून खोपी-शिरगाव येथील रघुवीर घाट ३१ जुलैपर्यंत पर्यटकांकरता बंद करण्यात येत आहे, असा आदेश खेड उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांनी दिला.
जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून पुष्कळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून पूरसदृश स्थितीमुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे. वादळी वार्यासह पडणार्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहे.