निरर्थक ‘साम्यवाद’ शब्द !

‘सजिवांतील एकही जीव दुसर्‍या जिवासारखा नसतांना, उदा. २ झाडे, २ कुत्रे, तसेच पृथ्वीवरील ७५० कोटी मानवांपैकी कोणतेही २ सारखे दिसत नाहीत. एवढेच नाही, तर त्यांची वैशिष्ट्येही निरनिराळी असतात, तरीही ‘साम्यवाद’ शब्द वापरणार्‍यांची ‘बुद्धी किती क्षुद्र आहे’, हे लक्षात येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मणीपूरमुळे युरोपचा त्रागा का ?

भारताची प्रतिमा मलिन करू पहाणार्‍या युरोपीय महासंघाला भारताने योग्‍य प्रत्‍युत्तर देऊन वठणीवर आणावे, ही भारतियांची इच्‍छा !

पुणेकरांनो, शाडू आणि चिकण मातीच्‍या श्री गणेशमूर्ती खरेदी करा ! – डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्‍त आयुक्‍त, पुणे

पुणेकर नागरिकांनो, शाडू माती, चिकण माती अशा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्‍या श्री गणेशमूर्ती खरेदीस प्राधान्‍य द्यावे.

पुण्‍यात आढळले डेंग्‍यूचे ६६ संशयित रुग्‍ण; १२ जणांना डेंग्‍यूचे निदान !

महापालिका हद्दीत यंदा जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्‍यूचे ४७२ संशयित रुग्‍ण आढळले होते. याच कालावधीत डेंग्‍यूचे निदान झालेले २१ रुग्‍ण आढळले होते आणि ते सर्व जानेवारी ते मार्च या कालावधीत सापडले होते.

धार्मिक क्षेत्रांचे पावित्र्य जपा !

नुकतेच केदारनाथ आणि बद्रीनाथ या तीर्थक्षेत्रस्‍थळी भ्रमणभाष अन् चित्रीकरण यांवर बंदी घालण्‍यात आली आहे. काही लोक तिथे भक्‍तीपूर्ण दर्शन घ्‍यायला अल्‍प आणि पर्यटनासाठीच अधिक जातात.

बँडस्‍टँड (वांद्रे) येथे व्‍हिडिओ काढतांना समुद्रात बुडून पत्नीचा मृत्‍यू !

मागून समुद्राच्‍या मोठमोठ्या लाटा येत होत्‍या. त्‍या वेळी मुलाने आई-वडिलांना बजावलेही; पण त्‍यांनी ऐकले नाही. तितक्‍यात एक मोठी लाट आल्‍याने दांपत्‍य समुद्रात पडले. पती मुकेश सोनार याला लोकांनी वाचवले; पण पत्नी ज्‍योती सोनार (वय ३२ वर्षे) हिला वाचवता आले नाही.

वक्‍फ संपत्ती (प्रॉपर्टी) – मुस्‍लिम वक्‍फ बोर्ड विरुद्ध जिंदाल ग्रुप !

‘वक्‍फ संपत्ती’ या नावावरून आजकाल बरेच विषय समाजमाध्‍यमांवर, तसेच दूरचित्रवाहिन्‍यांवर चर्चिले जात आहेत. त्‍यात काही तथ्‍य, तर काही ठिकाणी अतिशयोक्‍ती असते. याविषयी नेमका कायदा काय सांगतो ? ते महत्त्वाचे ठरेेल.

‘दीप अमावास्‍ये’ला ‘गटारी अमावास्‍या’ म्‍हणून हिणवणार्‍या धर्मद्रोही विचारांचे खंडण !

आषाढ अमावास्‍येच्‍या दुसर्‍या दिवसापासून ‘श्रावण’ हा पवित्र मास (यंदाच्‍या वर्षी अधिक मास चालू होत आहे) चालू होत असल्‍याने असंख्‍य जण त्‍या काळात मांसाहार वर्ज्‍य करतात.

भारतीय तरुणाशी लग्‍न करण्‍यासाठी पाकिस्‍तानमधून आलेल्‍या सीमा हैदरची चौकशी करून षड्‍यंत्र उघड करणे आवश्‍यक !

पाकिस्‍तानमधील सीमा हैदर ही तिच्‍या ४ मुलांसह पाक ते दुबई, दुबई ते नेपाळ आणि नेपाळमधून भारतात घुसली. तिच्‍या पतीला हे ४-५ मास माहिती नव्‍हते. शेवटी सीमा नावाचे हे कोडे पाकची गुप्‍तचर यंत्रणा ‘आय्.एस्.आय.’ची हस्‍तक आहे ?

अन्‍नाचे पचन नीट होण्‍यासाठी चावून चावून जेवावे

‘आपण जे अन्‍न जेवतो, ते पूर्णपणे पचले, तरच शरीर निरोगी रहाते. जेवण नीट पचले नाही, तर पोटात वायू (गॅसेस) होणे, बद्धकोेष्‍ठता यांसारखे त्रास होतात. जेवण नीट पचण्‍यासाठी ते पुष्‍कळ बारीक व्‍हायला हवे. यासाठी चावून चावून जेवायला हवे.’