पुणेकरांनो, शाडू आणि चिकण मातीच्‍या श्री गणेशमूर्ती खरेदी करा ! – डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्‍त आयुक्‍त, पुणे

पुणे – पुणेकर नागरिकांनो, शाडू माती, चिकण माती अशा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्‍या श्री गणेशमूर्ती खरेदीस प्राधान्‍य द्यावे. ‘प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस’पासून (पीओपी) बनवलेल्‍या मूर्तीवर बंदी असल्‍याने त्‍या खरेदी करू नयेत, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त डॉ. कुणाल खेमणार यांनी केले आहे.

पीओपीच्‍या मूर्ती आणि विषारी रंग वापरल्‍याने पर्यावरणास धोका निर्माण होतो. त्‍यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती कारागीर आणि उत्‍पादक यांसाठी मे २०२० मध्‍ये मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत. त्‍यांचे काटेकोर पालन करणारे श्री गणेश मूर्तीकार किंवा व्‍यावसायिक यांच्‍याकडून मूर्ती खरेदी करण्‍यास प्राधान्‍य द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.