श्री विठ्ठलाची उपासना आणि ती करण्यामागील शास्त्र !

श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच एक रूप आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या पूजेपूर्वी, तसेच आषाढी किंवा कार्तिकी एकादशी आदी तिथींना घरी किंवा देवळात श्रीविष्णुतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलमूर्तीचे सूक्ष्मचित्र

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे सूक्ष्म-दृष्टीला झालेले दर्शन

कार्तिकी एकादशी

‘कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला तरी चालतो आणि शिवाला तुळस वहाता येते. हे असे का ? एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तीभावाने भरवलेला पेढा प्रत्यक्ष ग्रहण करणार्‍या पांडुरंगाचे भक्तवात्सल्य !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला. तेव्हा तो गायब झाला.

भगवद्भेटीसाठी भक्ताची धारणा कशी असावी ?

भक्तानेसुद्धा भगवंताला (पांडुरंगाला) ज्यामुळे आनंद होईल, असे वर्तन करणे आवश्यक आहे. यासाठी त्याने भावावस्थेत राहून प्रत्येक कर्म करायला हवे. भगवंतभेटीसाठी वारकरी उत्सुक असल्याने ते तसे करतात.

श्री विठ्ठलाच्या उपासनेत टाळ-मृदुंगांचा गजर करण्याचे महत्त्व !

टाळ-मृदुंगांच्या गजराने श्री विठ्ठलाच्या मूर्तीभोवती असणारी नवग्रहमंडले, नक्षत्रमंडले, तसेच तारकामंडले जागृत होतात आणि या मंडलादी देवतांच्या आशीर्वादाने नरजन्माचा उद्धार होण्यास साहाय्य होते.’

हे सख्याहारी हृदयारविंद ।

तुझी कृपा होवो श्रीहरि पांडुरंग ! हे परम शक्तीशाली गोविंद । हे मनमोहन माधव मुकुंद ।। १ ।। दर्शन घेता तुझे पांडुरंग  । मजवर चढला भक्तीचा रंग ।। २ ।। पाहुनी तुजला पांडुरंग । धन्य झाले श्रीरंग ।। ३ ।। टाळ, चिपळ्या आणि मृदंग । मधुर स्वरात गातात तुझाच अभंग ।। ४ ।। हे भक्तवत्सल … Read more

भगवंताला कोणते भक्त (वारकरी) आवडतात ?

भगवान श्रीकृष्ण भागवतात म्हणतात, ‘मला भोळ्या भक्तांची अतिशय आवड आहे. ती गोडी तुला काय सांगू ? ते नसतील, तर कुणी कितीही सुखाचे उपचार केले, तरी ते मला आवडत नाहीत. अशा भोळ्या भक्तांना मी उत्तम ‘भागवत’, म्हणजे ‘भक्त’ समजतो.

गुरुस्तवन पुष्पांजली

जीवनातील प्रत्येक घटनेत आपण ‘मधुराधिपती’ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची आपल्यावर असलेली अपार करुणा अनुभवण्याचा प्रयत्न करूया !