पनवेल येथील हिंदु राष्ट्र-धर्म जागृती सभेचा ४० गावांमध्ये प्रचार !

हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने १२ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथील ‘दि मिडल क्लास को-ऑप. हाऊसिंग सोसायटी’च्या मैदानावर हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात येणार आहे.

सासवड (जिल्हा पुणे) येथे २६ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांवर गुन्हा नोंद !

सातारा येथून कोंढवा येथे कत्तलीसाठी गोवंशियांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे, ही बातमी अक्षय कांचन आणि त्यांचे सहकारी गोरक्षक ऋषिकेश कामथे, प्रतिक कांचन आदींना समजली.

नगर येथील साकूर भागात भुताटकीच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणे आवश्यक आहे. तसेच बळजोरीने किंवा आमीष दाखवून धर्मांतर करणार्‍यांना कठोर शिक्षा होणेही तितकेच आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हत्या प्रकरणाशी काही संबंध नाही ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

भाजप सरकारच्या काळात दिवसाढवळ्या कुणी कायदा-सुव्यवस्था मोडत असेल, तर त्याला शिक्षा होणारच आहे, अशी स्पष्ट चेतावणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. येथील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अमरावती येथे आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील म.न.पा. शाळा क्रमांक ६ चे मैदान येथे १२ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेची अमरावतीवासियांना उत्कंठा लागलेली आहे. याविषयीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

बुलढाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न !

गेल्या ४ दिवसांपासून भूमीगत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी अंगावर पेट्रोल ओतून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पीकविमा, अतीवृष्टीचे रखडलेले साहाय्य आणि कापूस दरवाढ यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक झालेले आहेत.

(म्हणे) ‘औरंगजेबाने बांधलेल्या महालाचे सुशोभिकरण करा !’

अशा नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही कारवाई करणार नाही, उलट अशांना विरोध करणार्‍यांना ‘मुसलमानविरोधी’ ठरवेल, हे लक्षात घ्या आणि अशा पक्षाला निवडणुकीत त्याची जागा दाखवून द्या !

विद्यार्थ्यांना अश्लीलतेमुळे वादग्रस्त ठरलेला ‘पठाण’ चित्रपट दाखवला !

विद्यार्थ्यांवर राष्ट्र-धर्माचे संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना अश्लील चित्रपट दाखवणार्‍या अशा शाळा विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ?

पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यूची ‘एस्.आय्.टी.’ चौकशी होणार ! – देवेंद्र फडणवीस

दैनिक ‘महानगरी टाईम्स’ चे राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूची विशेष अन्वेषण पथकाद्वारे (एस्.आय्.टी.) द्वारे चौकशी केली जाईल, असा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.

पुणे येथे १२ फेब्रुवारी या दिवशी ‘मातृ-पितृ पूजन महोत्सव’ साजरा करण्यात येणार !

‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजनदिन’ करण्याचे ‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्हाणके यांचे आवाहन