पुणे येथे १२ फेब्रुवारी या दिवशी ‘मातृ-पितृ पूजन महोत्सव’ साजरा करण्यात येणार !

‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजनदिन’ करण्याचे ‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्हाणके यांचे आवाहन

श्री. सुरेश चव्हाणके

पुणे – ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे युवा पिढीमध्ये स्वैराचार आणि चंगळवाद वाढत आहे. पाश्चात्त्यांच्या या अंधानुकरणाऐवजी युवा पिढीमध्ये आई-वडिलांविषयी आदरभाव वृद्धींगत व्हावा, यासाठी समस्त हिंदु आघाडी युवा संघाच्या वतीने १२ फेब्रुवारी या दिवशी येरवडा, पुणे येथे दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात ‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके सहभागी होणार असून हिंदूंनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.