सभेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन !
अमरावती, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील म.न.पा. शाळा क्रमांक ६ चे मैदान येथे १२ फेब्रुवारी या दिवशी होणार्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेची अमरावतीवासियांना उत्कंठा लागलेली आहे. याविषयीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर म्हणाले, ‘‘वर्ष २००८ पासून हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या माध्यमातून समिती देशभरात मोठ्या प्रमाणात जागृती करत आहे. यामुळे आज भारताची वाटचाल हिंदु राष्ट्राच्या दिशेने होत आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित रहावे.’’
समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे यांनी सांगितले, ‘‘प्रसार, बैठका, पोस्टर, होर्डिंग, रिक्शाद्वारे उद्घोषणा अशा विविध माध्यमांतून, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय या सर्वांना सभेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहाण्याचे आवाहन केले जात आहे.’’
महावीर मिशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नीलेशचंद्र महाराज जैन मुनी म्हणाले, ‘‘गोहत्या, लव्ह जिहाद हे संकट कायमस्वरूपी थांबवण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा सभांचे आयोजन आज आवश्यक झाले आहे. सकल जैन समाजाने मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित रहायचे आहे, असे आवाहन या पत्रकार परिषदेमधून मी करतो.’’
पत्रकार परिषदेला महावीर मिशन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नीलेशचंद्र महाराज जैन मुनी, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे, रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे या उपस्थित होत्या.