सर्वधर्मसमभावी हिंदूंसाठी हे लज्जास्पद !

‘जात्यंधता, सर्वधर्मसमभाव आणि बुद्धीप्रामाण्यवाद यांच्या आहारी गेलेल्या हिंदूंनी स्वातंत्र्यानंतर प्रगती केली आहे, असे एकतरी क्षेत्र आहे का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

देशात पुन्हा मुखपट्टी (मास्क) वापरणे बंधनकारक होण्याची शक्यता ! – केंद्रशासन

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोना अजून संपलेला नाही; पण भारत प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सिद्ध आहे. आम्ही सर्व संबंधितांना सतर्क रहाण्यास आणि दक्षता वाढवण्यास सांगितले आहे.

हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी धर्माचरण आवश्यक ! – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती

दिग्रस येथील श्री. मल्लिकार्जुन मंदिर सभागृह येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी पेण येथे २५ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी पद, पक्ष, संघटना, संप्रदाय, जात-पात हे सर्व बाजूला सारून आता धर्मरक्षणासाठी एक हिंदू म्हणून या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग जोतिबा डोंगर परिसरात पार पडला !

‘अवघ्या समाजाला सकारात्मक दिशा निश्चितपणे नारी शक्ती देईल’, असा विश्वास विश्व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ संघटक श्री. शंकर गायकर यांनी या वेळी व्यक्त केला.

हडपसर (पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी घेतली हिंदुत्वनिष्ठांची भेट !

आज भारतात हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांवर अनेक आक्रमणे होत आहेत. यावर उपाय म्हणजे हिंदूंना जागृत आणि संघटित करणे !

गावकारभार्‍यांसमोरील आव्हाने !

निवडून आलेले सर्वच जण वाईट असतात, असे नाही; परंतु अशा चांगल्यांची संख्या अगदी नगण्य आहे. इथे उल्लेखलेल्या विषचक्रातून गावाला बाहेर काढण्यासाठी त्यांची शक्ती अपुरी पडते. अशा चांगल्यांच्या पाठीमागे सर्वसामान्यांनी आता ठामपणे उभे राहिले पाहिजे, तरच गावे आणि खेडी खर्‍या अर्थाने समृद्ध बनतील !

हुतात्मा उद्यानाकडे सातारा नगरपालिकेचे दुर्लक्ष !

उद्यानाकडे दुर्लक्ष करणारे असंवेदनशील प्रशासन ! असे प्रशासन काय कामाचे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? उद्यानाकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा करायला हवी, तरच पुन्हा अशा चुका होणार नाहीत !

लाच स्वीकारणार्‍या ग्रामसेवकाला पकडले !

तळागाळापर्यंत पोचलेल्या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कठोर शिक्षापद्धतीच अवलंबायला हवी !

पैशांचा हव्यास ?

‘आवश्यक तितकाच धनसंचय करूया आणि निःस्वार्थी हेतूने समाज, राष्ट्र अन् धर्म यांसाठी कार्य करणार्‍या संतांच्या मार्गदर्शनाखाली मनुष्य जीवनाचे सार्थक करण्यासाठी झटूया.